गडचिरोली : ‘रविवारी’ भरतो चार तालुक्याच्या सीमेवर मोठा “कोंबडा बाजार”

1381

– पोलिसांची कारवाई मात्र शून्य
The गडविश्व
गडचिरोली, दि.२६ : जिल्ह्यात अवैध धंद्यांना उत येतानाचे दिसून येत असून “कोंबडा बाजार” (कोंबड्यांची झुंज लावणे) वर बंदी असतांनाही चार तालुक्याच्या सीमेवर राजरोसपणे ‘रविवार’ आणि ‘बुधवारला’ “कोंबडा बाजार” भरवला जातो. यावर मात्र पोलिसांची कारवाई शून्य असल्याचे दिसून येत असून राजरोसपणे भरविण्यात येणाऱ्या ‘कोंबडा बाजारावर’ कोणाचा आशीर्वाद असा सवाल उपस्थित होत आहे.
कोंबड्यांची झुंज लावून मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जातो. कोंबड्याला आपल्या जीवाची बाजी लावत हा खेळ खेळावा लागत असला तरी यातील एकाच पराभव म्हणजे मृत्यू आहे. मात्र यादरम्यान कोंबड्याच्या झुंजीवर लाखोंचा जुगार सुद्धा खेळला जातो. कोंबडा बाजाराचे अनेक शौकीन असून चार तालुक्याच्या सीमेवर भरविल्या जाणाऱ्या कोंबडा बाजारावर दूरवरून शौकीन कोंबड्याच्या झुंजीवर लाखो रुपयांचा जुगार लावतात. जिल्हा मुख्यालय तसेच जिल्ह्यातील तसेच बाहेर राज्यातूनही लोक तिथे पोहचत असतात. नवयुवकांनाही या कोंबडा बाजाराचे व्यसन जडले आहे. चार तालुक्याच्या सीमेवरील हा कोंबडा बाजार प्रख्यात असल्याचेही बोलल्या जाते. या ठिकाणी कोणीही कारवाईसाठी येत नसल्याचे असे खुद्द जुगार खेळणारे आणि भरवणारे दबक्या आवाजात बोलत असल्याचे कळते. त्यामुळे या कोंबडा बाजारावर कोणाचा आशीर्वाद आहे ? हा देखील संशोधनाचा विषय आहे. या कोंबडा बाजारात हॉटेल, इतरही दुकान तसेच कोंबड्यांवर उपचार करणारे स्वयंघोषीत डॉक्टर सुद्धा आपला दवाखाना खुलेआम लावून बसत असल्याचे कळते. परिसर मोठा असल्याने आठवडी बाजारपेक्षा अधिक गर्दी ‘रविवार’ च्या कोंबडा बाजार वर होत असल्याचेही बोलल्या जात आहे. रविवारी शासकीय सुट्टी असल्याने या प्रख्यात कोंबडा बाजारावर जुगार खेळण्यास शासकीय कर्मचाऱ्यांचीही मांदियाळी राहत असल्याचे कळते. जर रविवारी कारवाई झाली तर अनेक शासकीय कर्मचारीही जाळ्यात सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र या कोंबडा बाजारावर कोणाचाही धाक नसल्याने खुलेआम कोंबडा बाजार भरवला जात आहे. आता पोलीस प्रशासन आपल्या हद्दीत शोध घेऊन त्या कोंबडा बाजारावर कारवाई करणार काय ? याकडे लक्ष लागले असून जर स्थानिक पोलीस प्रशासनाने आपल्या हद्दीत कारवाई केली नाही तर खुद्द पोलीस अधीक्षक याकडे लक्ष घालतील काय हे पाहणे सुद्धा तेवढेच महत्वाचे ठरणार आहे.©
(the gadvishva, gadchiroli news, kombda bajara, crime, aheri, sironcha, chamorshi, mulchera, bhmragad, korchi, kurkheda, armori, dhanora, gadchiroli, etapalli, mulchera, ashti, alapalli, chatgao)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here