– २० रुग्णांची फायब्रोस्कॅन तपासणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात शनिवार १७ ऑगस्ट २०२४ रोजी पोटविकार ओपीडीचे आयोजन करण्यात आले होत. पचनसंस्थेशी निगडीत विकाराचे निदान करण्यासाठी शारीरिक तपासणी व उपचार करण्यात आले. पोटातील अल्सर, गिळण्यामध्ये अडचण व वेदना होणे, पित्ताशयातील खडे, छातीत जळजळ, पोटदुखी, पोट फुगणे, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, शौचातून रक्त पडणे, कावीळ (पांढरी व पिवळी ) रक्ताची उलटी, असामान्य आतड्याची हालचाल, मळमळणे, आतड्या मधील सुज, पातड शौच, अल्कोहोलिक लिव्हर डिसीज,पोटात पाणी होणे अशी लक्षणे असलेल्या ५७ रुग्णांची डॉ.सिद्धार्थ धांडे यांनी पोटविकार तपासणी केली. तसेच २० रुग्णांची फाईब्रोस्कॅन तपासणी केली. फायब्रोस्कॅन चाचणी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी यकृताच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते. हे यकृताची कडकपणा आणि लवचिकता मोजते, जे फायब्रोसिस आणि सिरोसिस सारख्या यकृत रोगांची उपस्थिती आणि तीव्रता याबद्दल मौल्यवान माहिती प्रदान करू शकते. यकृताची स्थिती निर्धारित करण्यासाठी हे उपकरण कंपनाचा वेग मोजते. हिपॅटायटीस सी, यकृत रोग आणि अल्कोहोल-संबंधित यकृत रोग यासारख्या परिस्थिती असलेल्या रुग्णांमध्ये यकृताच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी ही चाचणी वापरली जाते. ओपीडीमध्ये ईसीजी, एक्सरे, फाईब्रोस्कॅन व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०% सवलत प्रदान करित आहे. पोटविकार ओपीडी दर महिन्याच्या पहिल्या शनिवारला नियोजित असून जास्तीत रुग्णांनी पोटविकार ओपीडीचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolilocalnews #muktipath )