मित्राच्या वाढदिवसाची पार्टी ठरली जीवघेणी : कारच्या भीषण अपघातात दोन ठार, दोन जखमी

2396

– अपघातात कारच्या दर्शनी भागाचा अक्षरश: चुराडा
The गडविश्व
भंडारा, दि.०१ : मित्राच्या वाढदिवसानिमित्त हॉटेलमध्ये जेवण करून भंडारा कडे परततांना चारचाकी वाहन झाडावर जोरदार आदळुन झालेल्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार तर दोघेजण गंभीर झक्याची घटना कोरंभी ते पिंडकेपार रस्त्यावर शुक्रवारच्या मध्यरात्री १:३० वाजताच्या सुमारास घडली.
राजेश सुनिल शिंगाडे (२०), रा. नवेगांव (अड्याळ) व प्रणय राष्ट्रपाल सुखदेवे (२३), रा. कोरंभी, अशी मृतकांची नावे आहेत तर अक्षय रामप्रसाद कांबळे (२४), रा. आंबेडकर वॉर्ड बेला व अमर मनोहर बोरकर (२७), रा काेरंभी असे जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर भंडारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल सुखदेवे याचा वाढदिवस होता. मित्र राजेश शिंगाडे, प्रणय सुखदेवे, अक्षय कांबळे व अमर बोरकर हे चारही मित्र जेवनासाठी हिल साईड हॉटेल कोरंभी येथे गेले होते. जेवण आटोपल्यानंतर वाहन चालक हर्षल सुखदेव मित्रांना स्वगावी सोडण्यासाठी एमएच ४० सीएच ८५१८ क्रमांकाच्या अल्टो कार ने निघतांना मित्रांनी भंडारा येथे चहा पिण्यासाठी जाण्याचा आग्रह धरला असता रात्री दीड वाजताच्या सुमारास कोरंभी वरुन भंडाराकडे अल्टोने जात असतांना चालकांचे वाहनावरुन नियंत्रण सुटले आणि कार जोरदार झाडावर आदळली. ही धडक एवढी भीषण होती की त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला व दोघेजण गंभीर जखमी झाले. तर कारच्या दर्शनी भागाचा अक्षरश: चुराडा झाला. पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here