– उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हेडरी अंतर्गत पोमकें हेडरी व पोमकें बुर्गी (ये.) येथे दिले जाणार प्रशिक्षण
The गडविश्व
गडचिरोली, दि.०२ : जिल्हयातील गरजु सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन प्रोजेक्ट उडाण अंतर्गत पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्रातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींकरीता गडचिरोली पोलीस दल व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पोमकें हेडरी व पोमकें बुर्गी (ये.) येथे आज 01 डिसेंबर 2023 रोजी “हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षणाचे”पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.
सदरचे प्रशिक्षण हे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, हेडरी व पोलीस मदत केंद्र बुर्गी (ये.) येथे देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी दुर्गम-अतिदुर्गम भागातील एकुण 50 बेरोजगार उमेदवार सहभागी झाले होते. प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले. प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या उमेदवारांचे मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी कौतुक केले असून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असून, नेहमी तुमच्या पाठीशी राहील, आपले मित्र व आप्तस्वकीय यांना देखील रोजगाराच्या बाबतीत अवगत करून त्यांनी देखील गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या कुटूंबियांचे राहणीमान उंचवावे.
आतापर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक 601, नर्सिंग असिस्टंट 1262, हॉस्पीटॅलीटी 337, ऑटोमोबाईल 281, इलेक्ट्रीशिअन 233, प्लंम्बींग 35, वेल्डींग 38, जनरल डयुटी असिस्टंट 384, फील्ड ऑफीसर 11 व व्हीएलई 52, सेल्समॅन 5 असे एकुण 3394 युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर 209 मत्स्यपालन 147, कुक्कुटपालन 620, बदक पालन 100, वराहपालन 10, शेळीपालन 212, शिवणकला 277, मधुमक्षिका पालन 63, फोटोग्राफी 100, भाजीपाला लागवड 1755, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण 1062, टु व्हिलर दुरुस्ती 134, फास्ट फुड 170, पापड लोणचे 94, टु/फोर व्हिलर प्रशिक्षण 592, एमएससीआयटी 231, कराटे प्रशिक्षण 48 व सॉफ्ट टॉईज प्रशिक्षण 70 असे एकुण 5929 युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख सा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश सा., उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी बापुराव दडस तसेच प्रथम एज्युकेशन फाऊडेशनचे संस्था प्रमुख आशिष इंगळे, ट्रेनर अमोल खंदारे, ट्रेनर विशाल पाल हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता हेडरीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. सुनिल दौंड, पोमकें बुर्गी (ये.) चे प्रभारी अधिकारी पोउपनि. सचिन आरमल तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.