– तरुणांसाठी स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी; सौर, बेकरी, निर्यात आणि उद्योजकतेवर विशेष भर
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३१ : जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत’ लक्षित गटातील तरुणांसाठी निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक तांत्रिक, व्यवस्थापकीय आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत, असे प्रकल्प अधिकारी के. पी. टाकळे (MCED, गडचिरोली) यांनी सांगितले. टाकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अमृत’ लक्षित गटातील उमेदवारांसाठी चार प्रकारचे निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत, ज्यांचा कालावधी १८ दिवसांचा असेल:
निवासी प्रशिक्षण कार्यक्रम (१८ दिवस) :
1. अमृत सूर्यमित्र (सौर ऊर्जा): सौर तंत्रज्ञान व स्थापना प्रशिक्षण
2. अमृत-बेकरी: बेकरी उत्पादन व व्यवसाय व्यवस्थापन
3. अमृत आयात-निर्यात: आंतरराष्ट्रीय व्यापार व निर्यात प्रक्रियेचे ज्ञान
4. अमृत REDP: उद्योजकतेच्या सर्वांगीण पैलूंवर आधारित निवासी प्रशिक्षण
अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम:
1. उद्योजकता विकास (२१ दिवस)
2. तांत्रिक उद्योजकता विकास (३० दिवस)
3. क्षमता बांधणी प्रशिक्षण (०६ दिवस)
या प्रशिक्षणांमध्ये व्यवसायाचे नियोजन, शासकीय योजना, मार्केटिंग तंत्र, ग्राहक व्यवस्थापन, बँकिंग प्रक्रिया, प्रकल्प अहवाल लेखन, कायदेशीर प्रक्रिया आणि उद्योजकीय गुणसंपदा या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर व्यवसाय उभारणीसाठी MCED कडून मोफत मार्गदर्शन व पाठपुरावा केला जाईल.
पात्रता व अर्ज प्रक्रिया :
– ‘अमृत’ लक्षित गटातील किमान ८वी उत्तीर्ण युवक-युवती
– जातीचा उल्लेख असलेले शासकीय कागदपत्र
– तहसीलदारांकडून रहिवाशी व उत्पन्नाचा दाखला आवश्यक
– निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाईल
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ५ ऑगस्ट २०२५
इच्छुकांनी खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा : के. पी. टाकळे (प्रकल्प अधिकारी, MCED) : मो. ९१६८६६७१८१
विक्रांत पांडे (अमृत जिल्हा व्यवस्थापक): मो. ९८३४३२३७२७
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड आणि नागपूर विभागाचे विभागीय अधिकारी हेमंत वाघमारे यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, युवती, उद्योजक व नवउद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #SkillDevelopment #FreeTraining#EntrepreneurshipOpportunity #GadchiroliYouth #SolarTraining #WomenEntrepreneurs #MCED #AmrutProgram #YouthEmpowerment
#गडचिरोली_तरुणांसाठी_संधी #मोफत_प्रशिक्षण #स्वयंरोजगार #अमृत_उद्योजकता #सौरऊर्जा_प्रशिक्षण #महिला_उद्योजक #गडचिरोली_विकास #MCED_गडचिरोली #कौशल्य_विकास_शिबिर













