The गडविश्व
गडचिरोली, ०४ : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात बुधवार दिनांक १२ जून २०२४ रोजी मूत्रविकार तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुत्रविकार तपासणी शिबिरासाठी दत्ता मेघे हॉस्पिटल सावंगी, वर्धा येथील मुत्रविकार विशेषज्ञ सर्च रुग्णालय चातगाव येथे तपासणी करीता येणार आहेत.
मूत्रविकार ओपीडी मध्ये मूत्राशयाचा कर्करोग, अंडाशयावर सूज, किडनी स्टोन, मूत्राशय पिशवी मध्ये स्टोन असणे, लघवीची नळी चिपकलेली असणे , मूत्राशय नळीमध्ये स्टोन अटकलेला असणे , प्रोटेस्ट ग्रंथीची वाढ होणे तसेच लघवीतून रक्त जाणे, लघवी अटकत/ थांबत येणे अशी लक्षणे असल्यास मूत्रविकार तज्ञांचे मार्गदर्शन व उपचार सुविधा उपलब्ध केली आहे. ज्या रुग्णांना ऑपरेशनची आवश्यकता असेल त्यांची सर्च रुग्णालयात तपासणी व ऑपरेशन पूर्णपणे मोफत होईल. तसेच सर्च मधील प्रयोगशाळा तपासणी व आवश्यकता असलेली सर्च बाहेरील तपासणी उदा. सोनोग्राफी, सिटी स्कॅन इत्यादि मोफत दरात करण्यात येईल. तसेच ऑपरेशन भरती दरम्यान रुग्ण व एक नातेवाईक यांना मेस सुविधा मोफत दिल्या जाईल, तरी बुधवार दिनांक १२ जून २०२४ रोजी रुग्णांनी सर्च रुग्णालयात येऊन जास्तीत जास्त रुग्णांनी मुत्रविकार मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )