स्वातंत्र्यानंतर प्रथमच आमदार पोहोचले बंदूर गावात; ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या

16

स्वातंत्र्यानंतर प्रथमच आमदार पोहोचले बंदूर गावात; ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या
– रस्त्याअभावी विकासापासून दूर असलेल्या गावात आमदार रामदास मसराम यांची भेट; बांबू कटाईचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. १७ : तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या बंदूर गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच एखाद्या आमदाराने भेट दिल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. आजवर रस्त्यासारखी मूलभूत सुविधाही न पोहोचलेल्या या गावात आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.
गावापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य रस्ताही नसताना आमदार मसराम यांनी दुर्गम भागातील बंदूर गाव गाठल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी ग्रामस्थांनी प्रामुख्याने बांबू कटाईचा गंभीर प्रश्न मांडला. या समस्येमुळे स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींकडे आमदारांचे लक्ष वेधण्यात आले.
ग्रामस्थांनी मांडलेल्या बांबू कटाईच्या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार रामदास मसराम यांनी दिले. लोकप्रतिनिधी थेट गावात पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
यावेळी काँग्रेस कमिटीचे धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, माजी सभापती परसराम टिकले, देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, माजी उपसभापती नितीन राऊत, छायाताई कोल्हे यांच्यासह सुनील टोप्पो, सिमीन एक्का, अलेकझेंर टोप्पो, दिपाल तिर्की, हबील बरवा, मानसीक तुलावी, संतोष केरकट्टा, अंध्रेस तिर्की, प्रेमप्रकाश केरकट्टा, महेश तुलावी, राजकुमार नैताम, सुनील केरकट्टा, माधीन केरकट्टा, लालसाय तुलावी, चैतु उईके, राजेश तुलावी, मानसाय तुलावी, विजय तिर्की, जोहन बडा, सिशुन तिर्की, मनु बडा, जालीम केरकट्टा, चंधु मिज, शिशील टोप्पो यांच्यासह गावातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Dhanora #BandurVillage #RamdasMasram #TribalDevelopment #RuralDevelopment #RoadConnectivity #BambooCutting #MaharashtraPolitics

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here