कामाच्या ठिकाणी महिलांच्या संरक्षणासाठी तक्रार समिती स्थापन अनिवार्य

68

कामाच्या ठिकाणी महिलांच्या संरक्षणासाठी तक्रार समिती स्थापन अनिवार्य
– जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित व सन्मानजनक वातावरण मिळावे यासाठी भारत सरकारने २०१३ पासून “महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम” लागू केला आहे. या अधिनियमाच्या तरतुदीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अशासकीय कार्यालये, दुकाने, वैद्यकीय केंद्रे, महामंडळे, उद्योगधंदे, कंपन्या, करमणुकीची ठिकाणे, शैक्षणिक संस्था व खाजगी आस्थापनांमध्ये किमान १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असल्यास अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे.
समिती स्थापन न करणाऱ्या आस्थापनांवर अधिनियमातील कलम २६ नुसार ५० हजार रुपयांपर्यंत दंड, तसेच पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड किंवा परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असा इशारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सौ. ज्योती कडू यांनी दिला आहे.
समितीची माहिती कार्यालयाच्या दर्शनी भागात फलकाद्वारे प्रदर्शित करणे आवश्यक असून, समितीची नोंदणी SHE BOX पोर्टलवर करणे बंधनकारक आहे. तसेच वार्षिक अहवाल, कायद्याविषयी जनजागृती कार्यक्रमांची माहिती पोर्टलवर अपलोड करून ती जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात सादर करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बॅरेक क्र. १, खोली क्र. २६ व २७, कॉम्प्लेक्स एरिया, गडचिरोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन शेवटी करण्यात आले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here