The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ७ जून : शासकीय आश्रम शाळेमध्ये दीर्घकाळ कालावधीपासून काम करणाऱ्या रोजंदारी कामगारांची सभा धानोरा तालुक्यातील लेखा येथे ६ जून २०२३ ला आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत रोजंदारी कामावर शासकिय आश्रमशाळेतील रोजंदारीवर काम करित असलेल्या कामगारांना अग्रक्रमाने कामावर घेण्याची मागणी प्रा. दहिवडे यांनी मार्गदर्शन करताना करण्यात आली.
दहिवडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या रोजंदारी कामगारांची सभा आयोजित करण्यात आली होती. दीर्घकाळ कालावधीपासून आमचे कडून शासन काम करून घेत आहे मात्र कायम एका कर्मचाऱ्यांपेक्षा निम्मे वेतन देखील आम्हाला दिले जात नाही त्यातच पुढे कामावर येणार की नाही याचीही शाश्वती राहत नाही, समान वेतन समान काम हे तत्व जरी असले तरी त्याचे पालन केल्या जात नाही. एका कायम कर्मचाऱ्यांच्या वेतनात रोजंदारी वाले चार कर्मचारी कामाला लावले जातात, सर्व सोयी सुविधा पासून अलिप्त ठेवण्यासाठी ठेकेदारी पद्धत शासनाने अमलात आणले असल्याचा आरोप दहिवडे यांनी केला. नरेंद्र मोदी यांचे सरकार ठेका पद्धतीला प्रोत्साहन देणारे आहे आणि याच्यामुळे बेरोजगारावरती कुऱ्हाड कोसळत आहे. खाजगी क्षेत्रामध्ये असलेली ठेका पद्धत आता शासनाने कार्यालयामध्ये किंवा शासकीय शाळांमध्ये यांचा वापर करताना दिसते. अशा पद्धतीच्या विरोधात संघटन तयार करून एकजुटीने लढण्याचे कार्य सगळ्यांनी करण्याचे आव्हान दहिवडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन दुधबळे यांनी केले तर आभार मोहन दुगा यांनी मानले. सदर सभेला जीवन हिरासिंग टेकाम, चंद्रकला गणेश नैताम, राधा नरोटे, अजय खोब्रागडे, अनिल उसेंडी, प्रफुल गुरुनुले, नेताजी कोलते, अमोल उके, साईनाथ शिडाम, शशीकांत गेडाम, पंकज अलाम, मुकेश मेश्राम, निकेश सहारे, महेश राऊत, रोहन उईके, चंद्रकांत भानारकर, सुचिता किंरंगे, मंजुषा वरखडे आदी कामगार उपस्थित होते.