गोंड गोवारी जमातीचे संविधानिक हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

628

– सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार खऱ्या गोंड गोवारी ने दाखविले सांस्कृतिक दर्शन
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ७ जून : सर्वोच्च न्यायालयाने १८ डिसेंबर २०२० रोजी सिविल अपील क्रं. ४०९६ / २०२० मध्ये एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. परंतु आज हा निर्णय लागून सुद्धा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार ने या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नसल्याने संविधानिक व वैधानिक तरतुदीनुसार असलेल्या खऱ्या गोंड गोवारी जामतीच्या समुदायातील व्यक्तींना जातीचे व वैद्यता प्रमाणपत्र मिळण्यास प्रचंड त्रास सहन करावे लागत आहे. शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांना शिष्यवृत्ती तसेच शबरी घरकुल योजना तथा आदिवासींना मिळणाऱ्या इतर सोइ सवलती देण्यास प्रकल्प कार्यालय कार्यालय तथा शासन – प्रशासन टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे संविधानिक मूलभूत हक्काचे हनन होत आहेत.
संतापलेल्या गोंड गोवारी जमातीने या बाबीचा तीव्र निषेध करीत आपल्या संविधानिक व वैधानिक तरतुदीनुसार ५ जून २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांचे समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करीत जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाद्वारे विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने २० डिसेंम्बर २०२० च्या निर्णयाच्या पॅरा क्रं. ९२ नुसार गोवारी या शब्दासोबत गोंड हा उपसर्ग लावला असल्यामुळे गोवारी जमातींचा गोंड या जमातीसोबत संबंध आहे. तसेच गोवारी ही जमात गोंड जमातीची उपजमात असून गोंड जमातीसी आत्मीयता व आप्तभाव आहेत. अनुसूचित जमातीच्या यादीत गोंड गोवारी ही नोंद गोंड जमातीची उउपजमात म्हणून आली हे काकासाहेब कालेलकर आयोगाच्या १९५५ च्या अहवालातून स्पष्ठ होते. न्यायालयाने पॅरा क्र. २४ , २५ , २६ मध्ये संविधानिक व वैधानिक कलम ३४२ व ३६६ या तरतुदीचा आधार घेत पॅरा क्र. ३१ नुसार मागासवर्गीय आयोगाला कलम ३४० नुसार संविधानिक दर्जा प्राप्त असून आयोगाने १९५५ ला गोवारी जमातीची शिफारस गोंड जमातीची उपजमात म्हणून केलेली होती परिणामी गोंड गोवारी ही नोंद अनुसूचित जमातीच्या यादीत झाली.
तसेच पॅरा क्र ७५ नुसार मध्यप्रदेश राज्यासाठी कालेलकर आयोगाने गोंड जमातीची उपजमात म्हणून गोवारी जमातीची शिफारस केलेली होती. परंतु ती नोंद गोंड गोवारी नावाने समाविष्ठ झाली असल्याने पॅरा क्रं ८७ नुसार सर्वोच्च न्यायालय म्हणणे आहे की , गोवारी ही गोंडाची उपजमात आहे असे मागासवर्गीय आयोगाने अभ्यास व संशोधन करून शिफारस केलेली आहे. त्यामुळे या आयोगाच्या अहवालाकडे दुर्लक्षित करता येणार नाही. मग या गोवारी जमातीची नोंद ही गोंड गोवारी झाल्याने , गोंड गोवारी कुणास समजावे ..? यासाठी न्यायालयाने Anthropological Survey of India , People of India , National Series Valun III on The Scheduled Tribe , तसेच Ethnographic nots , Social study चा आधार घेऊन पॅरा क्र. ८३ नुसार खऱ्या गोंड गोवारी विषयी सांस्कृतिक माहिती चे सखोल विश्लेषण केलेले असून जे व्यक्ती किंवा समुदाय हे दिवाळीला ढालीची खेडवतात पूजा करतात , त्यांचे देव हे नागोबा, वाघोबा, मोठादेव, भिवसेन देव आदी आहेत. तसेच या जमातीत जात पंचायत असून त्या प्रमुखास शेंड्या म्हणतात तसेच जन्म विधी, लग्न विधी, मृत्यू विधी आदीविषयी सखोल माहिती दिली आहे. तरीपण आज सरकार सर्वोच्च न्यालायांच्या निर्णयाची अंमलबजावणी करून खऱ्या गोंड गोवारी ला न्याय देऊ शकले नाही. करीता आज विविध मागण्यांसाठी न्यायालयाने समाविष्ठ केलेल्या संस्कृती चे दर्शन घडवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी व खऱ्या गोंड गोवारी जमातीला त्यांचे संविधानिक हक्क मिळावे व जात व वैद्यता प्रमाणपत्र तसेच इतर आदिवासींच्या सोइ सवलती मिळाव्यात यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी आदिवासी गोंड गोवारी संस्कृतींव कल्याण मंडळ जिल्हा शाखा गडचिरोली चे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here