The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.१६ : खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त मुरुमगाव आणि पन्नेमारा येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन मुरुमगावचे सरपंच शिवप्रसाद गवर्णा आणि धानोरा तालुका काँग्रेस महिला अध्यक्ष तथा पन्नेमाराच्या सरपंचा शेवंताताई हलामी यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले.
यावेळी खासदार किरसान यांच्या प्रतिमात्मक नोटबुकचे वितरण करण्यात आले. सरपंच यांनी दोन्ही शाळांना भेट देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सभापती जयलाल मार्गीया, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवदास टेकाम, ग्रामपंचायत सदस्य अभिजित मेश्राम, मुख्याध्यापक चंदू रामटेके, शिक्षक गेडाम, शिक्षक मालिया, पदवीधर शिक्षिका गायत्री खेवले, शिक्षिका सुमन किरंगे, रविता शेडमाके, संगीता भडके, शिक्षक जगदीश बावणे, रुपेश शिवणकर यांची उपस्थिती लाभली.
प्रमुख अतिथींनी खासदार डॉ.किरसान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन उच्च शिक्षण घेऊन समाजसेवा करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक चंदू रामटेके यांनी केले तर आभार विद्यार्थिनी खुशबू मिस्त्री हिने मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
