भूकंपाने हादरले : २४ तासात तब्बल पाच वेळा भूकंपाचे धक्के

179

– परिसरात भीतीचे वातावरण,
The गडविश्व
श्रीनगर १८ जून : भूकंपाच्या धक्क्याने परिसर हादरून गेला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये २४ तासांत सौम्य तीव्रतेचे ५ भूकंप आले. त्यापैकी ४.५ तीव्रतेचा भूकंप सर्वात मोठा होता. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी दुपारी २ वाजून ०३ मिनिटांनी ३.० तीव्रतेच्या भूकंपानंतर पहिला हादरा जाणवला. कटरा येथे रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.१ इतकी होती. आज पहाटे ३ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास पुन्हा भूकंप झाला. कटरा येथे ११ किमी खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी लडाखच्या लेहमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. एका वृत्तसंस्थेनुसार, ईशान्य लेहमधील या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.१ इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, भूकंप दुपारी २.१६ वाजता झाला. या भूकंपामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. याआधी शनिवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दुपारी २.०३ वाजता झालेल्या ३.० तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या डोंगराळ रामबन जिल्ह्यात होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here