– ३०० लोकांना केली मदत
The गडविश्व
गडचिरोली, १७ सप्टेंबर : मागील २ दिवसापासून गोसेखुर्द धरणाच्या विसर्गामुळे वैनगंगा नदी व इतर नद्यांची पाणी पातळीत वाढ झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातुन जाणारे गडचिरोली-नागपूर व गडचिरोली-चामोर्शी मार्ग बंद असल्याने आंतरराज्य वाहतूक करणारे ट्रक मोठ्या प्रमाणावर नदीच्या दोन्ही किनाऱ्यापासून गेल्या ३ दिवसांपासून लांब रांगेत उभे आहेत. सदर वाहनचालक व सोबतच्यांना आज रविवार १७ सप्टेंबर २०२३ रोजी स्पंदन फाउंडेशन, गडचिरोली हतर्फे मोफत जेवण व पाण्याची सोय करण्यात आली.यावेळी प्रामुख्याने स्पंदन फाऊंडेशनचे प्रा.आशिष ढोले, सतीश त्रिनगरिवार, प्रा.सूरज बोमावार, संतोष नरोटे,आकाश कंकलवार, रूपेश घोडाम, लोकेश मडावी, सुरेंद्र इष्टाम,राहुल मडावी, अमित धोडरे, चंद्रशेखर मोलूगुरवार,अजित नरोटे,आशुतोष शेंडे,अविनाश मडावी,मधुकर मार्गीया, अजय उसेंडी,मोहित नैताम, रुपेश ताराम, समीर शेंडे, अनिकेत खोब्रागडे उपस्थित राहून सहकार्य केले.