– गावाचा सर्वांगीण विकास हाच ग्राम पंचायत पदाधिकारी यांचा ध्यास
गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, ७ ऑगस्ट : तालुक्यातील गेवर्धा ग्रामपंचायतअंतर्गत गावामध्ये सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण हे उद्देश समोर ठेऊन ग्रामकोष समिती गेवर्धा, खेडेगाव, कुरंडी आणि खैरीटोला ५ टक्के अबंध निधी अंतर्गत प्रती कुटुंब १ झाड याप्रमाणे रॉयल पॉम झाडाचे वितरण करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमांबद्दल चहुकडे चर्चा सुरु असून गावाचा सर्वांगीण विकास हाच ग्राम पंचायत पदाधिकारी यांचा ध्यास असे पदाधिकाऱ्यांमार्फत बोलले जात आहे.
याप्रसंगी सरपंचा सुषमा मडावी, उपसरपंच ओमप्रकाश बोगा, ग्रा.पं.सदस्य रोशन सय्यद, ज्योती कवडो, गेवर्धा ग्रामकोष समिती अध्यक्ष राजेंद्र कुमरे, तंटामुक्ती अध्यक्ष राजू बारई, कुरंडी ग्रामकोष समिती अध्यक्ष रमेश कवडो, खैरीटोला ग्रामकोष समिती सदस्य गुरुदेव बुद्धे, तंटामुक्ती सदस्य सुधीर बाळबुद्धे, माजी पो.पा.रेशीम गायकवाड, सावजी पदा सा, परसराम कवडो, अंगणवाडी सेविका मिना बुद्धे, उपस्थित होते. याप्रसंगी झाडे वाटप करण्यासाठी ग्रा.पं.कर्मचारी कृष्णा मस्के, दिनेश कावळे, नानेश्वर मस्के, राहुल नखाते, अमिता नाहामूर्ते यांचे सहकार्य लाभले.