– रुग्णालयात उपचार सुरु
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १० : तालुक्यातील मुरुमगाव वरून १० कि.मी.अंतरावर असलेल्या अतिसंवेदनशील भागातील केहकावाही मसाद या गावातील युवकावर रानडुक्कराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना ९ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
हिरामण सावजी वड्डे ( वय ३६) असे गंभीर जखमीचे नाव आहे. तो जंगलात चारोळी वेचत होता. यावेळी रानडुक्कराने त्याच्यावर हल्ला केला यात हिरामणच्या
डोक्यात, जांघेवर, चेहर्यावर, पाठीवर गंभीर स्वरूपात जखमा झाल्याने त्याला त्वरीत मुरुमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष सौ.लताताई पूंगाटे व माजी ग्रामपंचायत सदस्य मुनिर शेख हे उपस्थित होते. प्राथमिक उपचार वैद्यकीय अधिकारी उमेश धुर्वे उपकेंद्र कटेझरी व सहयोगी कर्मचारी NM संगीता चुधरी प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव यांनी प्राथमिक उपचार केला.
सदर घटनेने परिसरातील नागरिकात दहशत पसरली असून आता काही दिवसांनी तेंदूपत्ता हंगामही सुरु होणार आहे त्यामुळे नागरिक जंगलात तेंदूपत्ता तोडण्याकरिता जात असतात. या घटनेने मात्र नागरिकात धास्ती पसरली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora #loksabhaelection2024 )














