The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ३० : महसूल विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धानोरा तालुक्यातील निमगाव ते मिचगाव मासरगाटा परिसरात अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरचा महसूल विभागाने पाठलाग करून पकडला पण त्या ट्रॅक्टरवर आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नव्हती त्यामुळे सदर ट्रॅक्टर वर कधी आणि कोणती कारवाई करणार याकडे लोकांचे लक्ष लागले होते. त्यानुसार अखेर ‘त्या’ ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई केली.
महसूल विभागाला मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार १७ एप्रिल ला सायंकाळी नायब तहसीलदार देवेंद्र वाळके, नायब तहसीलदार बारापात्रे व पुरवठा निरीक्षक नंदावर यांच्या चमुने निमगाव ते मीचगाव मासरगट्टा या परिसरात रात्रोला अवैध रीतीने भरलेल्या ट्रॅक्टर चा पाठलाग केला. ट्रॅक्टर चालकाने तो ट्रॅक्टर एका शेतामध्ये नेला व ट्रॅक्टर तिथेच फसला. त्यानंतर ट्रॅक्टर चालक चाबी सोडून पसार झाला. त्यानंतर सदर ट्रॅक्टरचा पंचनामा केला. पंचनाम्यानंतर ट्रॅक्टरची चाबी पोलीस पाटील निमगाव यांच्याकडे सुपूर्द केली. परंतु दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर ज्या ठिकाणी फसला होता त्या ठिकाणी नव्हता. त्यामुळे महसूल विभागाने पकडलेला ट्रॅक्टर त्याच ठिकाणी रेतीखाली करून ट्रॅक्टर घेऊन गेले अशी माहिती निमगाव येथिल पोलीस पाटील यांनी देवेंद्र वाळके नायब तहसीलदार यांना दिली. १८ एप्रिल रोजी संबंधित घटने बाबत एका पत्रकाराने विचारणा केली असता, त्यांनी ट्रॅक्टर मालकांना सांगितले असून ट्रॅक्टर धानोरा तहसील कार्यालयात लावण्यास सांगितले परंतु अजूनही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केलेला नाही. त्यामुळे परत विचारणा केली असता त्यांनी याबाबत तहसीलदार लोखंडे यांच्याकडे याबाबत माहिती दिली आहे. पुढील कारवाई ते करणार करणार आहे असे वाळके यांनी सांगितले. परंतु आजतागायत कोणतीही कारवाई केली नव्हती. निवडणूकीच्या कामात व्यस्त असलेल्या महसूल विभागाला कारवाई करता आलेली नव्हती. परंतु निवडणुकीनंतर निमगावं येथील राजेंद्र वासुदेव सहारे व वासुदेव तनु सहारे राहणार निमगाव यांच्या मालकीचा एम एच ३३ टी ०९६१ क्रमांकाचा ट्रॅक्टर धानोरा तहसील कार्यालयात जमा करून ट्रॅक्टर वर दंड ठोकला आहे. त्यामुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या चालकाचे धाबे दणाणले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews #dhanora)