– वाहनधारकांना होतोय त्रास
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.१२ : तालुक्यातील मिचगाव मार्गावर तिन ठिकाणी छोट्या नाल्यावर मोरीचे बांधकाम करण्यात आले. या मोरी बांधकामाला वर्ष उलटले तरीही पुलाचे कडा भरण्यात आल्या नाहीत त्यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना प्रवाशांना कमालीचा त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
मुरमाळी ते सोडे मार्गावरुन मिचगाव फाट्यापासून ते गावापर्यंत तीन ठिकाणी नव्याने नाल्यावर, लहान मोरीचे बांधकाम करण्यात आले आहे. केलेल्या बांधकामाला सरासरी एक वर्ष झाल्याचे गावकरी सांगतात. बांधकाम झाल्यापासून संबंधित कंत्राटदार बांधकामांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अजून पर्यंत पुलाच्या मध्यभागी आणि बाजुच्या कडांना मुरुमाचा भरण न भरल्याने पुलावर गाडी बाजूला घेऊन उभे राहता येत नाही. तसेच रस्त्यावरून येत जा करणाऱ्या लोकांना कमालीचा त्रास होत आहे. बांधकाम केलेल्या पुलावर दोन वाहने विरुद्ध दिशेने आल्यास एकाच वेळी वाहन क्रास करता येत नाही. गावकऱ्यांनी संबंधित कंत्राटदराला वारंवार सूचित केल्यानंतर सुद्धा भरण भरलेले नाही. अखेर ग्रामपंचायत ने काही प्रमाणात भरण भरून मार्ग सुरू केला असला तरी कंत्राटदार मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सदर कंत्राटदारावर कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी केली आहे.