धानोरा : अज्ञात इसमाने धानाच्या गंजीची केली जाळपोळ

702

– शेतकऱ्याचे मोठे नुकसान
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.२९ : तालुक्यातील बोधनखेडा येथे अज्ञात इसमाने शेतकऱ्याच्या धान गंजीला ( पुंजणे) आग लावून जाळपोळ केल्याची घटना २८ नोव्हेंबर च्या रात्री ०८ ते ०८.३० वाजताच्या दरम्यान घडली. त्यामध्ये संपूर्ण धान जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर संकटं कोसळले आहे.
बोधनखेडा येथील शेतकरी घसिया बोगा व बाजीराव कुमोटी हे अल्पभूधारक शेतकरी असून मागील काही दिवसांपासून धान कापून भारे बांधून त्याचे पुंजने तयार करून ठेवले होते. काही दिवसांनी ते क्रेशर मशिन लावुन चुरना करणारच होते त्यापूर्वीच अज्ञात इसमाने २८ नोव्हेंबर च्या रात्री ते पेटवून दिले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने घासिया बोगा यांचे २५० भारे व बाजीराव कुमोटी यांचे ३०० भारे जळून खाक झाले असून यंदाची पूर्ण कमाई नष्ट झाली आहे. दोन्ही शेतकऱ्यांनी अज्ञात इसमाविरुद्ध कारवाई करून महसूल विभागाकडून मदतीची मागणी केली आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news , dhanora, gadchiroli, kurkgeda, armori, wadsa, korchi, aheri, bhamragadh, chamorshi, nagpur, chandrapur)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here