धानोरा तालुक्यातील धान खरेदी केंद्र सुरू करा

276

– तालुका काँग्रेस पार्टीची तहसीलदार यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २७ नोव्हेंबर : तालुक्यातील संपूर्ण कास्तकारांच्या धनाची कापणी व मळणी झालेली आहे. त्यामुळे धानोरा तालुक्यातील धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी धानोरा तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने धानोरा येथील तहसीलदार यांना २४ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, धानोरा तालुक्यातील सर्व जनता शेतीवर अवलंबून आहे. येथील शेतकरी वर्ग हा धान्य खरेदी केंद्र चालू नसल्यामुळे आपले उदरनिर्वाह करण्यासाठी कमीत कमी पैशात खाजगी दुकानदारांना गावातील सावकार व्यक्तींना आपले धान्य विक्री करून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची सोय करीत आहे. शासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपल्या स्तरावरून लवकरात लवकर धानोरा तालुक्यातील धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी धानोरा तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदन देताना धानोरा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष परसराम तानोजी पदा, उपाध्यक्ष कुलदीप इंदुरकर, मिलिंद किरंगे, शारिक शेख,कालिदास मोहुर्ले, प्रशांत कोराम, सुखदेव टेकाम, गजानन दुगा, किशोर भोयर, लोकेश राऊत, रवी उसेंडी, विनोद कोरेटी इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here