मुतनुर च्या पर्यटन विकासासाठी सातत्याने प्रयत्न : आमदार डॉ. देवराव होळी

44

– पर्यटन स्थळ मुतनुर येथे पर्यटन विकास कामांचे भूमिपूजन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : मुतनूरच्या पर्यटन विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असून पर्यटन विकासासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. आपण मुतनुरच्या पर्यटन विकासासाठी आणखी निधी मिळावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरूच ठेवू असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुतनूर येथील पर्यटन विषयक विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
मुतनुर हे पर्यटन स्थळ गडचिरोली जिल्हा वासियांना मोहून टाकत आहे. अशातच जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील पर्यटकांनी मुतनुर येथे भेट दिली असून अनेकांना याची भुरळ पडली आहे. नुकताच आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते मुतनुर येथे पर्यटन विकास कामांचे भूमिपूजन पार पडले.
यावेळी भाजपा जिल्ह्याचे नेते प्रणयजी खुणे, जैराम चलाख, साईनाथ बुरांडे, सुरेश शहा, सरपंच माधुरी आतला, बाबुराव झुरी, भाऊराव कुमरे, विनोद कोंदामी, डी. बी. नरोटे, अनिल नरोटे, सीताराम पदा, श्रीरंग नरोटे, काजल नरोटे, पिंकी नरोटे, देवाजी पुडो, कालिदास पुडो, सीताराम पदा, कान्हूजी नरोटे, यांचे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #MLAHOLI )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here