दारूमुळे नुकसानग्रस्त ६५ जणांनी घेतला उपचार

42

दारूमुळे नुकसानग्रस्त ६५ जणांनी घेतला उपचार
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : जिल्ह्यातील विविध गावांमध्ये मुक्तिपथ गाव संघटनेच्या विनंतीनुसार मुक्तिपथतर्फे गाव पातळी व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दारूमुळे आर्थिक, सामाजिक व आरोग्याचे नुकसान झालेल्या ६५ जणांनी उपचार घेत दारूचे व्यसन सोडण्यासाठी वाटचाल सुरु केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायदा लागू आहे. अवैध दारूविक्रेत्यांवर पोलिस विभागाच्या माध्यमातून सातत्याने कारवाई केली जात आहे. तसेच अवैध दारू विक्री विरोधात मुक्तिपथ व गाव संघटनेच्या माध्यमातून सातत्याने जागृती करून विविध कृत्या केल्या जात आहेत. अवैध दारूविक्रीमुळे दुर्गम व ग्रामीण भागात दारूचे व्यसन लागलेल्या रुग्णांना गावातच उपचार मिळावे, यासाठी गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथ तर्फे जिल्हाभरातील विविध गावांमध्ये व्यसन उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले. धानोरा तालुक्यातील फुलबोडी येथे गाव पातळी एकदिवसीय शिबिर घेण्यात आले असता १३ रुग्णांनी उपचार घेतला. गडचिरोली तालुक्यातील बोदली येथील शिबिरातून २३, सिरोंचा तालुक्यातील कौतुर रै येथील शिबिराचा लाभ १३ जणांनी घेतला. कुरखेडा तालुक्यातील खसोडा या गावात ६ पेशंटनी उपचार घेतला तसेच आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी येथे गाव पातळी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. त्यात एकूण १० पेशंटनी पूर्ण उपचार घेतला. अशाप्रकारे विविध गावातील ६५ जणांनी दारूचे व्यसन सोडण्यासाठी व्यसन उपचार घेतला. यावेळी तज्ञ समुपदेशक व संयोजकांनी रुग्णांना मार्गदर्शन, औषोधोपचार करीत दारूचे व्यसन सुटू शकते, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here