आदिवासी उमेदवारांकरीता मोफत स्पर्धापुर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

870

– कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोलीचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, २६ जून : आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोलीच्या वतीने जिल्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता MPSC पुर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षाबाबत स्पर्धापुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणाऱ्या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण व रोजगार नोदंणी कार्ड (EMPLOYMENT CARD )असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने आहे. प्रशिक्षणा दरम्यान रु.1000/- ( एक हजार रुपये ) विदयावेतन दिले जाणार आहे. प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवांराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते तसेच पोलीस भरती करणाऱ्या उमेदवांराना मैदानी सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जाते. कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध असून 01/07/2023 पासुन 26/07/2023 पर्यत या कार्यालयात अर्ज सादर करावेत तदनंतर मुलाखत 27/07/2023 रोजी आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.2 गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे. त्याकरीता उपस्थित राहावे व अधिक माहीतीसाठी कार्यालयाच्या 07132-295143 या क्रमाकांवर संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here