चुरचुरा ते नवरगाव रस्त्याचा वाली कोण ?

667

– नागरिकांसह विद्यार्थी त्रस्त
The गडविश्व
गडचिरोली, १९ डिसेंबर  : तालुक्यातील चुरचुरा ते नवरगाव या तीन किमीच्या जंगलव्याप्त रस्त्याची पूर्णतः चाळण झाली असून या रस्त्याचा वाली कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. मात्र संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
चुरचुरा ते नवरगाव हा तीन किमीचा रस्ता जंगलव्याप्त आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर रस्त्यावरील गिट्टी बाहेर निघाली आहे. या रस्त्याने जिल्हा मुख्यालयी कामकाजासाठी जाणाऱ्या नागरिकांसह मजूर व विद्यार्थ्यांची नेहमीच वर्दळ असते. मात्र रस्त्याची दुर्दशा झाल्याने नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. सध्या या परिसरात हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वावर असल्याने दुचाकी किंवा सायकलस्वारांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे.
या रस्त्यावरून नवरगाव व चुरचुरा येथील नागरिकांची नियमित ये -जा सुरू असते. मात्र जागोजागी खड्डे पडल्याने दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रस्त्यावर असलेल्या पाल नदीच्या पुलाची जीर्णावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष घालून रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) ( Churchura Navargao road) (PSG) (Olivier Giroud) (Deepika Padukone FIFA) (Closing ceremony World Cup 2022) (Argentina vs France) (Muktipath) (70 gram panchayat committees formed to create addiction free village)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here