व्यसनमुक्त गाव निर्माण करण्यासाठी ७० ग्रामपंचायत समित्या गठीत

228

– दारू व तंबाखु विरोधात कृती करण्याचा निर्णय
The गडविश्व
गडचिरोली,१९ डिसेंबर : गावाला दारू व तंबाखू विक्री मुक्त करण्याहेतू आतापर्यंत चामोर्शी तालुक्यात ७० मुक्तिपथ ग्रामपंचायत समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समितींच्या माध्यमातून विविध ठराव पारित करण्यात आले आहेत. काही ठिकाणी गावकऱ्यांच्या सहकार्याने निर्णयानुसार कृती केली जात आहे.
गावात सुरु असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे गावातील शांतता भंग होते. भांडण तंटे होतात, युवापिढी व्यसनाच्या मार्गाकडे वळते. दारूच्या या दुष्परिणामांमुळे गावांचा विकास पूर्णतः खुंटतो ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशातून व मुक्तिपथ अभियानाच्या पुढाकारातून प्रशासनाच्या सहकार्याने ग्रामपंचायत स्तरावर विशेष समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समितीमधील पदाधिकाऱ्यांमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रापं सदस्य, पोलिस पाटील, गाव संघटनेचे सदस्य, सचिव, पेसा अध्यक्ष, आशावर्कर, तमुस पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आदींचा समावेश आहे. आतापर्यंत चामोर्शी तालुक्यातील ७० ग्रामपंचायत स्तरावर या समित्यांच्या बैठका पार पडल्या असून समित्या पुनर्गठीत करण्यात आल्या. गावातून दारू व तंबाखू हद्दपार करण्यासाठी मुक्तिपथ कार्यकर्ते ग्राप पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत. सोबतच गावातील अवैध दारूविक्री बंद करणे, सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर कारवाई, दंड करणे, विक्रेत्यास शासकीय योजनांपासून वंचित ठेवणे, गावात पिऊन येणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, वारंवार सूचना करूनही अवैध व्यवसाय सुरूच ठेवणाऱ्यांवर पोलिस विभागाच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करणे आदी निर्णय घेण्यात आले आहेत.
चामोर्शी तालुक्यातील चापलवाडा, लखमापूर बोरी, पाविमुरांडा, फोकुर्डी, वायगाव, फराडा, पेटतळा, मार्कन्डा कं, मूरखळा चेक, इल्लूर, नवेगाव रै, घारगाव, वरूर, जैरामपूर, मुधोली चेक, अनखोडा, तळोधी मो, भाडभिडी मो, वाघोली, मार्कंडादेव, सगनापूर, दुर्गापुर, सोनापूर, कुनघाडा, घोट, वाकडी, रामाळा, नवरगाव, करूड, मुरमूरी, मोहूर्ली, भाडभिडी, गौरीपूर, गिलगाव, येडानूर, चाकलपेठ, मारोडा, वेलतुर तू, नवेगाव माल, मक्केपल्ली चेक 1, मक्केपल्ली माल, सिमुलतला, आष्टी, मुरखळा माल, बहादूरपूर, गणपूर रै, सोमनपल्ली, कढोली यासह ७० ग्रामपंचायत समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (PSG) (Olivier Giroud) (Deepika Padukone FIFA) (Closing ceremony World Cup 2022) (Argentina vs France) (Muktipath) (70 gram panchayat committees formed to create addiction free village)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here