चिमूर : शंकरपटाच्या आड चालतो अवैधरित्या ‘हा’ जुगार

1070

– पोलीस यंत्रणा निद्रावस्थेत
The गडविश्व
ता.प्र / चिमूर, दि.१७ : तालुक्यात शंकरपटाचे आयोजन केले जात आहे. मात्र या शंकरपटाच्या आड अवैधरित्या खुलेआम ‘झेंडी-मुंडी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खेळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जुगार चालत असल्याचे चित्र असून तालुक्यातील पोलीस यंत्रणा मात्र आद्यपही निद्रावस्थेत दिसून येत आहे.
चिमूर-मासळ-सिंदेवाही या मुख्य मार्गावर असलेल्या मदनापूर फाट्यालगत शंकर पटाचे आयोजन केल्या गेले आहे. मागील १० – १२ दिवसांपासून सुरू असलेल्या या शंकरपटात खुलेआमपणे अवैध ‘झेंडी-मुंडी’ या खेळातून अवैधरित्या जुगार सुरू असतो. या अवैध खेळाचे अनेकजण शौकीन पहावयास मिळत असून मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जातो. खुलेआम सुरू असलेल्या या अवैध जुगार खेळाचे लहाण्यांना सुद्धा व्यसन लागत असल्याचे दिसते. लहानापासून मोठ्यांपर्यंत या खेळाच्या जाळ्यात अडकतांना दिसत आहे. शंकरपटाच्या आड सुरू असलेल्या या अवैध जुगार खेळाकडे तालुक्यातील पोलीस यंत्रणेला जराशीही भनक लागली नसेल काय हे आश्चर्यच मानावे लागेल. तालुक्यात अवैध रित्या दारूविक्री, जुगार चालत असतांनाही पोलीस यंत्रणा मात्र निद्रावस्थेत दिसून येत आहे. शंकरपटाच्या आड चालणाऱ्या या जुगार खेळावर कोणाचा आशीर्वाद आहे ? या अवैध जुगार खेळास मुकसंमती कोणाची ? असा देखील सवाल उपस्थित होत असून दररोज या अवैध ‘झेंडी-मुंडी’ खेळातून हजारोंचा गल्ला ‘झेंडी-मुंडी’ चालवणारे जमा करत असल्याचे बोलल्या जात आहे. यात केवळ खेळणाऱ्याचे नुकसान होत असून या जुगाराचे अनेकांना व्यसन जडत आहे. शंकरपटामध्ये पोलीस यंत्रणेतील एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी ज्यामुळे अवैध धंद्यांना लगाम बसेल असे सुद्धा काही सुजाण नागरिकांकडून बोलल्या जात आहे. तर या शंकरपटावर काही पुढारी व त्या मोठ्या नेत्याचा आशीर्वाद असल्याचे सुद्धा बोलल्या जात असून या खेळातून लहाण्यांवर सुद्धा मोठा परिणाम होताना दिसत आहे. निद्रावस्थेतील पोलीस यंत्रणा यावर अंकुश लावणार काय याकडे लक्ष लागले आहे.

शंकरपटात “या” खेळाला उत

“झेंडी-मुंडी” हा खेळ मनोरंजन म्हणून खेळला जात असला तरी आता अनेक शंकरपटात यातून जुगार खेळल्या जात आहे. सहा घरांचा हा खेळ असतो. खेळ मालक हा एका डब्ब्यात सहा घराचे ठोकळे फेरबदल करून फिरवून डब्बा झाकतो. त्यानंतर खेळणारे शौकीन आपला अंदाज बांधून सहा घरातून काही घरावर पैसे मांडतात. काही वेळाने खेळ मालक हा ठोकळ्या वरून डब्बा उचलतो आणि शो करतो. तेव्हा जेवढे घर जास्त असतील तेवढे पट पैसे मिळत असते. त्यामुळे या खेळवार जुगार लावणाऱ्यांची संख्याही अधिक पाहायला मिळते. लावलेल्या पैशाच्या दुप्पट-तिप्पट पैसा मिळत असल्याने अनेकजण या मोहजाळेत अडकत असतात.
तर अनेकांच्या खिशाला कात्री लागताना दिसून आले आहे तर खेळ चनावणारे मात्र मालामाल होत असल्याचे बोलल्या जाते. एकूणच या खेळातून पैशाचा जुगार खेळला जात असल्याने यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणीही सुजाण नागरिकांकडून होत आहे.

(the gadvishva, the gdv, chimur, masal bk, madnapur, kolara, jhendi-mundi, jugar, chimur police)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here