१९ एप्रिल दिया मतदान किया ना..उन्दी मतदानता महत्व मंता’ ; गोंडी भाषेत सीईओ आयुषी सिंह यांचे मतदारांना आवाहन

1612

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनीही केले मतदारांना आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : “लोकशाही का पण्डुम साजरा किया ना, 19 एप्रिल दिया मतदान किया ना..उन्दी मतदानता महत्व मंता..” हे वाक्य आहेत गोंडी भाषेत गडचिरोलीच्या सीईओ श्रीमती आयुषी सिह यांनी मतदारांना केलेले आवाहन.
लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात येत्या १९ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनासह, पोलीस प्रशासन व आदी यंत्रणा निवडणुकीमध्ये गुंतलेली आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने जिल्ह्यातील निवडणुकांकडे देशभरातील नागरिकांचे लक्ष लागलेले असते. अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामी लागली आहे. अशातच मतदानासाठी मतदार न चुकता मतदान करावे याकरिता जिल्हाधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक निलोत्पल, सीईओ श्रीमती आयुषी सिंग यांनी मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे.
विशेष म्हणजे सीईओ श्रीमती आयुषी सिंह यांनी गोंडी भाषेत मतदारांना आवाहन केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #loksabhaelection2024 #sanjaydaine #spnilotpal #ceoayushising )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here