विदर्भ इंटरनॅशनल स्कूल मध्ये महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा

154

The गडविश्व
गडचिरोली, १ मे : स्थानिक विदर्भ इंटरनॅशनल स्कूल येथे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या प्राचार्या नेहरीका मंदारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान याप्रसंगी व्यवस्थापण विभाग प्रमुख प्रीती मुंढे व पूर्वप्राथमिक विभाग समनवयिका सम्रिन धमानी उपस्थित होत्या.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषण, गायन, नृत्य सादर केले. नृत्य व गायन साठी संगीत शिक्षक प्रणय मेडपल्लिवार यांनी सहकार्य केले तसेच धर्मेंद्र वंजारे सरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रीती चीचगरे व प्रशांती वाघमारे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील व्यवस्थापन विभाग व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here