The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०१ : येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात हेल्पिंग हॅण्ड बहुउद्देशीय संस्था, धानोरा यांच्या वतीने करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पायल मशाखेत्री, सचिव आशिष मशाखेत्री तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था धानोराचे निर्देशक शुभम देशपांडे यांनी इयत्ता 11 वी व 12 वीतील विद्यार्थ्यांना स्किल रूट अंतर्गत व्यवसाय अभ्यासक्रम व कौशल्याधारित शिक्षणाच्या महत्त्वाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुरजुसेz बुरमवार , पठाण व दरडे मॅडम उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध शंकांचे निरसन केले.
करिअर निवड आणि कौशल्य विकास या विषयावर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी दिशा मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













