८ एप्रिलला ‘सर्च’ रुग्णालयात ‘ह्रदयरोग ओपीडी’

122

The गडविश्व
गडचिरोली, ६ एप्रिल : धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित ‘सर्च’ रुग्णालयात नागपूर येथील ‘अवंती’ रुग्णालयाच्या सहकार्याने नियमित ह्रदयरोग ओपीडी सुरु झाली आहे, प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी ही ओपीडी असेल. ८ एप्रिल रोजी सर्च रुग्णालयात हृदयरोग ओपीडी घेण्यात येणार असून, हृदयरोगतज्ञ डॉ. उदय माहोरकर व सहकारी डॉक्टरांची टीम हे तपासणी करणार आहेत.
ह्रदयरोग असलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, व्यायामाचा अभाव, तणावपूर्ण आयुष्य, धुम्रपान, तंबाखू, गुटखा यांसारखे व्यसन अशा कारणांमुळे हृदयविकार वाढत आहेत. जन्मजात हृदयाला छिद्र असते, त्याला हार्ट डिसीज म्हणतात. त्याबरोबरच हार्ट अटॅकमुळे होणार्‍या मृत्युचे प्रमाण देखील वाढले आहे. हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिनीत रक्तपुरवठा बंद पडणे. काळाची गरज समजून आणि रुग्णामधील गुंतागुंतीच्या वाढत्या प्रवृत्तीचा विचार करून चातगाव येथील सर्च रुग्णालयात हृदयरोग ओपीडीला सुरुवात करण्यात आली आहे. ८ एप्रिल रोजी ओपीडी घेण्यात येणार असून हृदयरोगतज्ञ डॉ. उदय माहोरकर व सहकारी डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहेत. ह्रदयरोगाचे निदान करण्यासाठी शारीरिक तपासणी सोबतच (२डी इको व टी.एम.टी) तपासण्या केल्या जातील. तरी या ओपीडी लाभ रुग्णांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Game of Thrones) (Lucknow Super Giants) (Man City) (Bihar Board 10th Result 2023) (JioCinema) (Tata ipl 2023) ((Bombay High Court Recruitment for 160 Vacancies, Last date to apply is 7th April)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here