महाडीबीटी पोर्टलवरील निवड झालेला लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन

202

The गडविश्व
गडचिरोली, दि.२५ : जिल्हयात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्याकरीता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना राबविण्यात येत आहे. फलोत्पादन पिकाचा संशोधन तंत्रज्ञान, प्रसार, काढणीत्तोर तंत्रज्ञान, प्रक्रिया व पणन सुविधा यांच्या माध्यमातुन समुह पध्दतीने सर्वांगीण विकास करणे तसेच शेतकन्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे, पारंपारिक उत्पादन पध्दतीची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाची सांगड घालुन तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार करणे आदी या योजनेचे उद्दीष्ट आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत १४ व्या लॉटरी सायकलमध्ये महाडीबीटी प्रणाली वर मोठ्या संख्येने लाभार्थी निवड झालेली आहे. या नव्याने निवडलेल्या लाभार्थीने नजीकच्या सीएससी सेंटर तसेच संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी / कर्मचारी यांना प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि आपले आवश्यक कागदपत्रे तात्काळ अपलोड करुन घ्यावीत. या योजनेतंर्गत सर्वसाधारण, अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातीच्या प्रवर्गातील एकुण 731 शेतकऱ्यांचे विविध घटकाकरीता निवड झालेली आहे. यात प्रामुख्याने क्षेत्र विस्तार व पुनरुज्जीवन, पॅकहाऊस, शेडनेट हाऊस, प्लॅस्टिक मलचिंग, इत्यादी करीता मोठया संख्येने लाभार्थी निवड झालेली आहे. तरी नविन निवड झालेल्या लाभार्थांनी आपली आवश्यक कागदपत्रे नजिकच्या सेतु केंद्र अपलोड करण्याकरिता व तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाल संपर्क साधन्याकरीता आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here