अनधिकृत संस्थाबाबत माहिती देण्याचे आवाहन

161

The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : बेकायदेशीरित्या बालगृहे, अनाथाश्रम चालविले जात असल्याबाबत तसेच बालकांना अनधिकृतपणे डांबुन ठेवणे त्यांचे शारिरिक, मानसिक आणि लैगिंक शोषण होत असल्याबाबत घटना घडत असल्याबाबत निदर्शनास येत आहे. अनेक जिल्हयामध्ये अनधिकृत संस्था सुरु असल्याबाबत तसेच अनधिकृत संस्था सामाजिक माध्यमांचा वापर करुन त्यावर काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांची छायाचित्रे प्रसिदध करुन बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण )अधिनियम २०१५ चे कलम ७४ मधील तरतुदिचे सर्रास उल्लंघन करित असल्याची बाब निदर्शनास येत आहे.
तसेच सदर संस्था या सामाजिक माध्यमांचा वापर करुन समाजातील विधि स्तरावरील नागरिकांना भावनिकआवाहन करुन मोठया प्रमाणात निधी गोळा करीत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. अनधिकृत संस्थांचे हे कृत्य अतिशय गंभीर असून शासनाजवळ याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. अनधिकृत संस्थामध्ये प्रवेशितांवर लैगिंक अत्याचार, मारहाण, पलायन, बलात्कार, अतिप्रसंग, शारिरिक, मानसिक छळ, अशा अनुचित घटना पडण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जिल्हयात अशा अनिधिकृत संस्था आढळुन आल्यास तात्काळ ग्राम बाल संरक्षण समिती यांनी तालुका बाल संरक्षण समीतीच्या निदर्शनास आणुन देणे तसेच बालकांसाठी काम करणाऱ्या स्वंयसेवी संस्थानी देखील बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ चे उल्लघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
गडचिरोली जिल्हयामधील अशा अनधिकृत संस्थाचा शोध घेण्याच्या सुचना सर्व पोलिस अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितावर बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ मधील कलम ४२ नुसार कार्यवाही करण्यात येईल. यामध्ये कलम ४२ नुसार १ वर्षापर्यंत कारावास किंवा एक लाख रुपये किंवा अधिक इतका दंड अशा शिक्षेची तरतुद नमूद आहे. यासाठी गडचिरोली जिल्हयात १८ पर्यंतच्या वयोगटातील कामकरणाऱ्या मुलामुलींच्या निवासी संस्था यांची संस्था नोंदणी असणे आवश्यक आहे. नोंदणी नसल्यास त्यांची त्वरित नोंदणीकरुन घेण्यात यावी. गडचिरोली जिल्हयामध्ये अनधिकृत संस्था आढळल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय ०७१३२२२६४५ तसेच चाईल्ड हेल्पलाईन १०९८ व इमेल dwcdgadchiroli@gmail.com, dcpu.gadchiroli@gmail.com येथे त्वरित संपर्क साधावा. सदरच्या गैरप्रकारास आळा घालून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath #loksabhaelecation2024)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here