The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली व श्री. जीवन सीताराम पाटील मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथील विद्यार्थी कुमार प्रथम वासुदेव कोरेत याने नुकत्याच झालेल्या हरियाणा ( रोहतक युनिव्हर्सिटी ) येथे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत कास्य पदक प्राप्त केले आहे.
१५ ते १८ जानेवारी २०२८५ दरम्यान हरियाणा ( रोहतक युनिव्हर्सिटी ) येथे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कराटे चॅम्पियनशिप संपन्न झाली. या स्पर्धा मध्ये संपूर्ण भारतातून चार झोन सहभागी होते. त्यात प्रथम कोरेत यांनी – ६७ किलो कु्मिते मध्ये पंजाब, केरळ, गुजरात ला पराजित करून कास्य पदक पटकविले व गोंडवाना युनिव्हर्सिटी ला दरवर्षी प्रमाणे पदक जिकूंन देण्याची मोहीम कायम ठेवली आहे. या पूर्वी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली ला कराटे खेळात अनेक पदक जिंकून दिले आहे. प्रथम कोरेत याने यापूर्वी शालेय कराटे स्पर्धा मध्ये २ सुवर्ण पदक जिंकले आहे.
प्रथम कोरेत हा कोच शिहान योगेश चव्हाण व सेन्सई मिलिंद गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो, प्रथम कोरेत हा भारताचे प्रतिनिधी करून भारताला इंटरनॅशनल स्पर्धा मध्ये पदक जिंकण्याचे आशा बाळगतो आहे. त्यात गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली चे सहकार्य आवश्यक आहे. प्रथम कोरेत नी आपल्या यशाचे श्रेय गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली क्रीडा संचालिका श्रीमती अनिता लोखंडे व प्राचार्य संजय मुरकुटे, जिल्हा क्रीडा अधीकारी भास्कर घटाळे, गडचिरोली कराटे संघटना चे अध्यक्ष प्रशांत वाघरे, उपधाक्ष रुपराज वाकोडे, सौ. सोनाली चव्हाण, कपिल मसराम व आई वडील व समस्त गडचिरोली जनतेस दिले आहे.
