The गडविश्व
ता. प्र / भामरागड, दि. २६ : सांज मल्टी ॲक्टिव्हिटी डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट यस्टर एरिया बिणागुंडा स्थित भामरागड या स्वंयसेवी सामाजिक संस्थे द्वारा २५ सप्टेंबर २०२६ रोजी आयुष्मान मंदिर पथक ताडगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात ताडगाव येथील २५ महिला-पुरुष व पोलिस स्टेशन ताडगाव येथील १६ जवानांनी रक्तदान केले.
रक्त संकलानाकरिता उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथील रक्तपेटी चमू के वी मडावी,सरिता वाघ, निखिल कुमार कोंडपर्ती, शरद बांबोले, मेघराज शेख यांनी रक्त संकलन करून या पिशव्या उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे जमा करण्यात आल्या. रक्तदात्याना लालसु आत्राम यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. जगदीश कोंकमुत्तीवार यांनी रक्तदात्याणा स्वखर्चाने फळे वाटप केले.
रक्तदान शिबिर यशविरीत्या पाडण्यास डॉ. सत्तमवार, डॉ. मानकर, डॉ.वनकर, देवाशिष विश्वास, रविंद्र सादमवार, उमेश वनकर, किंकर मिर्धा, दुर्गेपाल कोडापे यांनी परिश्रम घेतले. सर्व रक्तदाते, वैद्यकीय चमू तसेच कार्यकर्ते यांचे रक्तदान शिबिराचे आयोजक तथा संचालक रुपलाल गोंगले यांनी आभार मानले.
