The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २५ : धानोरा शहरात वारंवार होणारी वीज खंडित होणे तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या कामात होत असलेले दुर्लक्ष या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी धानोरा तालुक्याच्या वतीने २४ जून रोजी एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस महावितरण विभागाचे अभियंते जांभुळकर व शाहू तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंते अतुल श्रीवास्तव व झा उपस्थित होते. नागरिकांनी शहरातील वारंवार वीज खंडित होणे, रोडवरील अपूर्ण कामे, वाहतुकीतील अडथळे याबाबत आपली तक्रार मांडली.
बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि संबंधित समस्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
स्थानिक पातळीवर नागरिकांच्या समस्या थेट संबंधित विभागापर्यंत पोहोचवून उपाययोजना घडवून आणण्यासाठी भाजपा धानोरा तालुका यांच्याकडून करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora #Dhanora #PowerOutage #HighwayIssues #BJPDhanora #PublicVoice #ElectricityProblem #NHAI #InfrastructureDevelopment #CitizensConcern #LocalGovernance
#धानोरा #वीजसमस्या #महामार्गकाम #BJPधानोरा #जनतेचाआवाज #महावितरण #राष्ट्रीयमहामार्गप्राधिकरण #धानोरा_विकास #विद्युतसंपत्ती #सामाजिकउपक्रम













