धानोरा ते गडचिरोली मार्गावरील मोठमोठे खड्डे देताय अपघाताला आमंत्रण

432

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २९ जुलै : धानोरा ते गडचिरोली मार्गावर राधेश्याम बाबा मंदिराजवळ रस्त्याच्या एका बाजूचा भाग पाण्याने मागील वर्षी वाहून गेला तो तसाच आहे तसेच लेखा गावासमोर मोठ मोठे खड्डे पडले होते. त्या खड्ड्यात पाणी साचत असल्याने चारचाकी वाहनाची व दुचाकी वाहनाची वाहन काढताना तारेवरची कसरत करावी लागत होती. तो खड्डा बुजविण्यात आला परंतु काकडयेली गावाजवळ त्याच रोडवर छोटे-मोठे खड्डे काकडेयेली जवळ आहे. त्या काकडयेलीच्या खड्ड्यातून वाहनधारकांना आपले वाहन काढत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कधी कधी तर वाहन त्या खड्ड्यात गेल्याने वाहनाचे नुकसान सुद्धा होत आहे त्यामुळे तेथील खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गडचिरोली ते धानोरा हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने दररोज जड वाहनाची ये जा असते यासह चारचाकी वाहने सुद्धा मोठ्या प्रमाणात चालत असतात. या रस्त्यावर जागोजागी लहान मोठे खड्डे पडले आहे .या खड्ड्यातून आपले वाहन काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच गडचिरोली ते धानोरा व धानोरा ते गडचिरोली येथील नागरिकांना आपले वाहन घेऊन दररोज सरकारी कार्यालयात बँक, शाळा, काँलेज व इतर खाजगी कामाकरिता परिसरातील नागरिकांना धानोरा ते गडचिरोली व गडचिरोली ते धानोरा मुख्यालयाच्या कामाकरिता ये जा लागते. त्यांना आपला जीव मुठीत घेऊन वाहनाचा प्रवास करावा लागतो त्यामुळे येथे रोडवर असलेल्या छोटे मोठे खड्डे बुजवण्यात यावे, त्याची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here