The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २९ जुलै : जय पेरसापेन हायस्कूल माळंदा येथील शिक्षक पदावर कार्यरत असलेले माध्यमिक शिक्षक चिरंजीवी गद्देवार यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानी मार्च २०२३ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी लागणारी सेट पात्रता परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली आहे. चिरंजीवी हे धानोरा तालुक्यातील लेखा या छोट्याश्या गावातील रहिवाशी असून त्याने महाविद्यालयीन शिक्षण धानोरा येथील जे. एस .पी .एम .कॉलेज मधून पदवित्तुर शिक्षण पूर्ण केले तर पदवीव्युतर शिक्षण यशवंतराव चव्हान मुक्त विद्यापीठ नाशिक येथुन गणित विषयात पूर्ण केले आहे.
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील यांना दिले आहे .तर संस्थेचे अध्यक्ष अब्दुल हकीम अरहीम, उपाध्यक्ष सौं .सी .ए .हकीम, सचिव शमशेरखा पठाण, शाळेचे मुख्याध्यापक प्राध्यापक शिक्षक इत्यादीनी अभिनंदन केले आहे.