आपल्या हक्कासाठी जागरूक व्हा : माजी आमदार डॉ. उसेंडी

241

– कुरखेडा येथे सल्ला गागरा शक्तीचे लोकार्पण सोहळा तथा गोंडी धर्म सम्मेलन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘जो वाचेल तो वाचेल’ म्हणजेच जो पुस्तकं वाचेल तो जीवनामध्ये वाचेल असे म्हटले आहे त्याचप्रमाणे नागरिकांनी आपल्या हक्कासाठी जागरूक होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी यांनी केले. ते गडचिरोली तालुक्यात येत असलेल्या कुरखेडा येथे गोंडी धर्म समिती आयोजित सल्ला गागरा शक्तीचे लोकार्पण सोहळा तथा गोंडी धर्म सम्मेलन या कार्यक्रमात आदिवासी बांधवांना मार्गदर्शनकरतांना बोलत होते.
पुढे बोलतांना, जागरुकता म्हणजे काय ? तुम्ही तुमच्या हक्कासाठी जागरूक झाले पाहिजे. ज्या प्रमाणे आपण आपल्या शेजारशी हितभर जमिन वाढविल्याने भांडण करत काळे फाटे धरून भांडत बसतो. म्हणजेच त्यावेळी आपण जागरुक होऊन आपला हक्क अधिकार मागत असतो. हे आपण आपल्या जमिनीसाठी जागरुक होत असतो. परंतू ज्या पद्धतीने आपल्याला संविधानानी दिलेले हक्क अधिकार आहेत. पण आपण त्या हक्क अधिकारासाठी झटत नाही किंवा आपल्या हक्कांसाठी लढा देत नाही. कारण ते हक्क अधिकार आपल्याला माहिती नाही. कारण शिक्षण नाही, वाचन नाही त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘जो वाचेल तो वाचेल’ म्हणजेच जो पुस्तकं वाचेल तो जीवनामध्ये वाचेल असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला एल.एम.उसेंडी, संदीप वरखंडे, आदिवासी नेते तथा सरपंच संदिप वरखडे, उपसरपंच दयाराम वरखेडे, डॉ. प्रियदर्शनी कोडापे, पोलिस पाटील मुकुंदा तुमराम, माजी पोलीस पाटील पांडुरंग लोंढे, शालीकराम कुमरे, कैलाश करपते आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here