गेवरा बुज येथे नागदिवाळी महोत्सव उत्साहात साजरा

583

The गडविश्व
ता.प्र / सावली, दि. २४ : तालुक्यातील गेवरा बूज येथे २३ व २४ डिसेंबर रोजी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेच्या वतीने दोन दिवसीय नगदिवळी मोहत्सव साजरा करण्यात आला.
नागदिवाळी महोत्सव निमित्त गावात स्वच्छ्ता व मिरवणूक, खण व मठ पूजा करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बारेकर चंद्रपूर, प्रा.धारणे, पी.एम.चौधरी माजी वनपरिक्षेत्र अधिकारी, हणवते लाइमन, कुस्माकर, वाकडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या याशवितेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष विनायक वाकडे, राजू नन्नावरे, ओमदेव श्रीराम, अभिनंदन घरत, मिथुन शेरकुरे, अंकित चौधरी, गणेश चौधरी, समस्त माना जमात कार्यकारणी यांनी सहकार्य केले. दरम्यान बिरसा कला मंच गडचिरोलीच्या वतीने कलापथक, पथनाट्य संस्कृतिक आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here