बांबू कटाईचा प्रश्न मार्गी लावणार : कटेझरीत आमदार रामदास मसराम यांनी जाणून घेतल्या ग्रामस्थांच्या समस्या

2

भगवान बिरसा कलासंगम 2.0 या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण (LIVE)

बांबू कटाईचा प्रश्न मार्गी लावणार : कटेझरीत आमदार रामदास मसराम यांनी जाणून घेतल्या ग्रामस्थांच्या समस्या
– विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा
The गडविश्व
ता.प्र/धानोरा, दि.१६ : तालुक्यातील कटेझरी येथे ६७-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी गावातील विविध समस्या जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा केली. विशेषतः बांबू कटाईसंदर्भातील गंभीर प्रश्न ग्रामस्थांनी मांडला. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत बांबू कटाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार मसराम यांनी दिले.
या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी गावातील विविध अडचणी आणि प्रलंबित प्रश्न आमदारांसमोर मांडले. त्यापैकी काही समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, तर इतर प्रश्न शासनस्तरावर पाठपुरावा करून मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांना या भेटीत प्राधान्य मिळाले.
जनतेच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हेच आपले कर्तव्य आहे, असे आमदार रामदास मसराम यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत कोराम, माजी सभापती परसराम टिकले, काँग्रेस कमिटी अध्यक्ष देसाईगंज राजेंद्र बुल्ले, धनपाल मिसार, माजी उपसभापती नितीन राऊत, माजी सरपंच शिवप्रसाद गवर्ना, भूपेंद्रसहा मडावी, शिवनाथ टेकाम, रामदास बोगा, छाया कोल्हे, ज्ञानदेव पिल्लारे, सागर वाढई, कमलेश बारस्कर, परशुराम ठाकरे, भावेश मुंगणकर, ऋषिकेश रामदास मसराम यांच्यासह वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here