मॅरेथॉनमधून गाव संघटना मजबुत करण्याचे आवाहन

161

– खुदीरामपल्ली येथील ३३ जणांचा सहभाग
गडविश्व
गडचिरोली, १९ एप्रिल : मूलचेरा तालुक्यातील खुदीरामपल्ली येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून एक झालेल्या लोकांना गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी मुक्तीपथ गाव संघटन मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये एकूण ३३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये ११ महिला, पुरुष ६, युवती ७ तर ९ युवकांचा सहभाग होता. दरम्यान, प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते दारूमुक्तीची मशाल पेटवून स्पर्धेची सुरवात करण्यात आली. यावेळी पोलीस पाटील सविता बर्मन, अंगणवाडी सेविका कल्पना पाल, ग्रामसभा अध्यक्ष तुलसी विश्वास, सरिता दास, सारिका दास, तालुका संघटक रुपेश अंबादे, नम्रता मेश्राम उपस्थित होते. सदर स्पर्धेचे रूपांतर सभेमध्ये करून विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. त्यांनतर अवैध दारूविक्रीचे गावाला होणारे नुकसान याबद्दल मुक्तीपथ तालुका चमूने मार्गदर्शन केले. गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी संघटन आवश्यक आहे. मुक्तीपथ गाव संघटनेत जास्तीत-जास्त लोकांनी जुडून गावाला दारूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी केले.

(The gdv) (the gadvishva) (gadchiroli news ) (muktipath) (serch gadchiroli) (PSG vs Lens) (News today) (Ashraf Ahmed) (Breaking News) (Femina Miss India 2023) (Atiq Ahmed)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here