निमगांव येथे अवैध रेती तस्करी कारवाईत एक ट्रॅक्टर जप्त

801

– फरार ट्रॅक्टर कोणाचा ?  गावकऱ्यांनी उपस्थित केला प्रश्न
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २५ : तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी होत असल्याने ती रोखण्याची मोठी जबाबदारी महसुल विभागाची असल्याने ही अवैध रेती तस्करी थांबविण्यासाठी धानोरा येथील महसूल विभाग कंबर कसून कामाला लागले आहेत. तालुक्यातील निमगांव येथे २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० ते १.०० वाजता महसूल विभागाला मिळालेल्या गोपनीय माहिती च्या आधारे टाकलेल्या धाडीत एक ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहे. मात्र इतर फरार ट्रॅक्टर कोणाच्या हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असून त्यावर अधिकारी कारवाई करणार कधी असा प्रश्न गावकरी विचारीत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, २२ फेब्रुवारीला तहसील कार्यालयातील अधिकाऱ्याना भुरानटोला येथील घाटावरुण अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यानंतर गस्त घालीत निमगाव येथे जाऊन ट्राँक्टर जप्त करुन धानोरा तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले.
भुरानटोला नाल्यांची रेती मोठ्या प्रमाणात चोरीला जात असुन शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसुन येते. येथील रेती परिसरातील बांधकामाला पुरविण्यात येत असल्याचे कळते. इतर ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करित असताना एकच ट्रॅक्टर पकडण्यात आली असून सदर ट्रॅक्टर माजी सरपंच ईश्वर दुगा यांच्या मालकीची असून वाहन चालकाचे नाव हरेद्र वासुदेव उसेंडी आहे. चालक व मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार वाळके यांनी दिली मात्र इतर ट्रॅक्टर बाबत विचारले असता ट्रॅक्टरचा आवाज येत होता. ट्रॅक्टरवर कारवाई करीत असता इतर ट्रॅक्टर अंधाराचा फायदा उचलत फरार झाल्याचे सांगितले. त्यामुळे अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांचे धाबे दणाणले आहे.
सदर कार‌वाई तहसीलदार लोखंडे मँडम यांच्या मार्गदर्शनाखाली, नायब तहसीलदार बी.के.वाळके, नायब तहसीलदार येरमे, आपुर्ति निरिक्षक नितिन नंदावार, स्थानिक कोतवाल यांनी केली.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews #dhanora #sankalpviksasyatra )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here