अमिर्झा येथे आढळली दुर्मिळ खवले मांजर

1880

– वनविभागाने सुखरूप सोडले नैसर्गिक अधिवासात
The गडविश्व
अमिर्झा, दि. ०३ : येथे गुरुवारला रात्रोच्या सुमारास दुर्मिळ खवले मांजर आढळून आली. वनविभागाने सदर खवले मांजरला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले.
अमिर्झा येथील काही नागरिकांना गुरुवारी रात्रीच्या सुमारास गावातील नालीमध्ये खवले मांजर निदर्शनास आली. याबाबतची माहिती वनविभागाला होताच तात्काळ वनविभागाचे कर्मचारी व RRT टीम घटना स्थळी जाऊन खवले मांजर ला सुखरूप ताब्यात घेतले. पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अमिर्झा गाव पुराणे वेढला होता त्यामुळे ही खवले मांजर पुराच्या पाण्यामध्ये वाहून आल्याच्या अंदाज व्यक्त केला जात आहे.
खवल्या मांजर रात्रीचर आहे. दिवसा ते आपल्या खोल बिळात झोपलेले असते. शरीराचे वेटोळे करुन ते झोपते. हे प्राणी आपल्या पुढच्या पायांवरील मोठ्या नखांनी खोल बिळे उकरतात. मुग्यांची व वाळवीची वारूळे उकरून त्यांतील मुंग्या व वाळव्या ते आपल्या चिकट जिभेने टिपून खाते.
खवले मांजर या वन्यप्राण्याबाबत समाजामध्ये अनेक गैरसमजुती आहेत. त्यातूनच सामान्य लोकांकडून खवले मांजराला मांसासाठी, तसेच जादूटोणासारख्या अंधश्रद्धेसाठी पकडण्यात येते त्यामुळे यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परंतु, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये वन्यप्राणी पकडणे, बंदिवासात ठेवणे, विक्री करणे, शिकार करणे, वाहतूक करणे हा गुन्हा आहे.
दरम्यान दुसऱ्या दिवशी पशुवैद्यकीय अधिकारी मृणाल टोंगे यांचेकडून वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सदर कारवाई उप वनसंवरक्षक मिलिश शर्मा याच्या मार्गदर्शनात प्रभारी सहाय्य्क वनसंवरक्षक व्ही मेडेवार, व्ही बारेकर, वनपरीक्षेत्र अधिकारी एन हेमके, क्षेत्रासाहाय्य्क आर तांबे, वनरक्षक एस आंबेडारे, आर आर टी सदस्य अजय कुकडकर, मकसूद सय्यद, गुणवंत बाबनवाडे,कुणाल निमगडे,पंकज फरकाडे, निखिल बारसागडे यांनी पार पाडली.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolilocalnews #gadchiroliforest #A rare scaly cat found in Amirza )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here