श्रमदानातून पाल नाल्यावर उभारला वनराई बंधारा

143

श्रमदानातून पाल नाल्यावर उभारला वनराई बंधारा
– जलसंधारणासाठी ग्रामस्थांचा पुढाकार
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १५ : धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायत रांगी व पी.एम. श्री. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, रांगी यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पाल नाल्यावर वनराई बंधाऱ्याचे बांधकाम श्रमदानातून करण्यात आले.
शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, नळयोजनेच्या विहिरींची पाणीपातळी टिकून राहावी तसेच जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निर्माण व्हावी, या उद्देशाने हा बंधारा उभारण्यात आला आहे. या उपक्रमामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.
या वेळी सरपंच सौ. फालेशवरी गेडाम, उपसरपंच नुरज हलामी, सदस्य शशिकांत साळवे, राकेश कोराम, दिनेश चापले, सौ. विद्या कपाट, सौ. अर्चना मेश्राम, सौ. शशिकला मडावी, सौ. वच्छल हलामी, ग्रामपंचायत अधिकारी मकरंद बांबोळे, मुख्याध्यापक हेमंत काटांगे, ग्रामपंचायत कर्मचारी नामदेव बैस, दीपक कुकुडकर, नितेश गेडाम, गावातील नागरिक तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रांगी येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामूहिक श्रमदानातून साकारलेला हा वनराई बंधारा जलसंधारणाच्या दृष्टीने आदर्श ठरत असून, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविले जात असल्याचे चित्र या उपक्रमातून दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here