– देशी-विदेशी दारू जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : चामोर्शी तालुक्यातील व पोटेगाव पोलिस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या गिलगाव जमीनदार येथील दारूविक्रेत्याकडून मोहफूल, देशी व विदेशी दारू जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत वासेकर असे विक्रेत्याचे नाव आहे .
गिलगाव जमीनदार या गावात दारू विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच होते. दारूविक्रीमुळे गावातील बऱ्याच युवकांना दारूचे व्यसन लागले. मद्यपी लोक घरातील वस्तू विकून दारू पितात. यामुळे गावातील महीला त्रस्त झाले आहेत. गावातील मुक्तीपथ गाव संघटनने अनेकदा दारूविक्री बंद करण्याचा प्रयत्न केला. सरपंच रेखा आलाम यांनी सुद्धा महिलांना घेवून पोटेगाव पोलिस मदत केंद्र व इतर अधिकारी यांना निवेदन देऊन गावातील दारू विक्री बंद करण्याची विनंती केली. त्यानुसार पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी भास्कर कांबळे यांच्या नेतृत्वात गावातील महिलांनी श्रीकांत वासेकर यांच्या घर परिसर व शेतात पाहणी केली असता, १५ लिटर मोहफुलाच्या दारूची कॅन, ३ चुंगडी देशी दारू व १ चुंगडी विदेशी दारू असा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी सदर दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर प्रभारी अधिकारी यांनी गावातील महिलांची बैठक घेऊन गावातील दारू विक्री बंद करण्याचे आश्वासन महिलांना दिले.
(#thegdv #thegadvishva #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )