भाऊबीजेची सरकारी कर्मचाऱ्यांना भेट! ११ नोव्हेंबरला अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी

3

भाऊबीजेची सरकारी कर्मचाऱ्यांना भेट! ११ नोव्हेंबरला अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी
The गडविश्व
मुंबई, दि. ९ : दिवाळीच्या आनंदात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने ११ नोव्हेंबर २०२६ रोजी भाऊबीजेनिमित्त अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे २०२६ या वर्षासाठी राज्यातील सार्वजनिक सुट्ट्यांची संख्या २४ झाली आहे. यासंदर्भातील अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे.

शासनाने जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये विविध सण, उत्सव आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश आहे. या सुट्ट्या राज्यातील सर्व शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम, महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना लागू राहणार आहेत.

दरम्यान, १ एप्रिल २०२६ (बुधवार) रोजी वार्षिक लेखापरीक्षणाच्या कामासाठी केवळ बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी मिळाल्याने दिवाळीच्या सणानिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक सुट्टीची भेट मिळाली आहे.

सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना👉Public-Holiday-2026-1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here