चारभट्टीत पैशांच्या वादातून मुलाने केली पित्याची हत्या
– शेकोटीतील जळत्या लाकडाने डोक्यावर प्रहार
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. ३१ : पैशांच्या वादातून मद्यधुंद मुलाने शेकोटीतील जळत्या लाकडाने वडिलांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांची हत्या केल्याची घटना बुधवारी (२९ ऑक्टोबर) सायंकाळी चारभट्टी (बिरसा नगर) येथे घडली. मनोहर निरंगशहा गोटा (५१) असे मृताचे नाव असून, नागेश मनोहर गोटा (२९) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
घटनेच्या वेळी गोटा कुटुंबीय अंगणात शेकोटी पेटवून जेवण करत होते. याचदरम्यान मनोहर आणि मद्यधुंद नागेश यांच्यात पैशांवरून वाद झाला. वादातून नागेशने शेकोटीतील जळते लाकूड उचलून वडिलांच्या डोक्यावर प्रहार केला. यात मनोहर यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागेशला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #kurkhedanews













