चिमूर : शेतात काम करताना वाघाची झडप; पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीचा मृत्यू

4

चिमूर : शेतात काम करताना वाघाची झडप; पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीचा मृत्यू
– चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रातील घटना; जंगलालगतच्या शेतात हल्ला
The गडविश्व
चिमूर, दि.१७ : जंगलालगतच्या शेतात काम करणाऱ्या ४५ वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रात घडली. उषा अंकुश गुरुनुले असे मृत महिलेचे नाव असून, पतीसमोरच वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
उषा गुरुनुले या पती अंकुश आणि गावातील एका सहकाऱ्यासह धान पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेल्या होत्या. सोयाबीन कापणीचे काम आटोपल्यानंतर त्या शेतातील कामासाठी आल्या होत्या. पती डिझेल इंजिन सुरू करत असताना उषा तण काढण्याचे काम करीत होत्या. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
वाघाने त्यांच्या मानेचा चावा घेत त्यांना जंगलाच्या दिशेने ओढत नेले. हा प्रकार पतीच्या डोळ्यांदेखत घडला. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ही घटना घडल्याने शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि चिमूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आवश्यक पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chimur #tadobaforest

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here