एटापल्लीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; CPI आणि किसान सभेची मागणी

8

एटापल्लीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; CPI आणि किसान सभेची मागणी
– अनियमित पाऊस, पावसातील खंड आणि कीड प्रादुर्भावामुळे खरीप पिकांचे नुकसान
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : एटापल्ली तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात अनियमित पाऊस, पावसातील दीर्घ खंड तसेच पिकांवरील कीड प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एटापल्ली तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) आणि ऑल इंडिया किसान सभा (AIKS) यांच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीसंदर्भात तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. केवळ पर्जन्यमानाच्या आकडेवारीच्या आधारे दुष्काळाचे मूल्यांकन न करता प्रत्यक्ष शेतपिकांची स्थिती तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने गावनिहाय पीक नुकसान सर्वेक्षण करून वस्तुस्थिती समोर आणावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीकविम्याचा लाभ आणि योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी केली. शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदन देताना सचिन मोतकुरवार, सुरज जककुलवार, रितेश जोई, देवराम नरोटे यांच्यासह CPI व किसान सभेचे कार्यकर्ते तसेच शेतकरी उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Etapalli #Gadchiroli #Drought #Farmers #CPI #KisanSabha #MaharashtraFarmers #CropDamage #GadchiroliNews #TheGadvishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here