धानोरा : समाजकल्याण निधीतून सभासदांना कुकर वाटप

124

धानोरा : समाजकल्याण निधीतून सभासदांना कुकर वाटप
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. २४ : जंगल कामगार सहकारी संस्था, धानोरा यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष लालाजी परसा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सभासदांना १० टक्के समाजकल्याण अधिदानातून स्टील कुकरचे वाटप करण्यात आले.
जिल्हा संघाचे अध्यक्ष पूर्णचंद्रराव रायसीडाम यांच्या हस्ते सभासदांना कुकरचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला अनंत साळवे, गजानन साळवे, ऋषिजी माशाखेत्री, गावडे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष लालाजी परसा यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्वर्गीय घनश्यामजी साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली धानोरा जंगल कामगार सहकारी संस्थेने मोठी मालमत्ता उभारली असून, संस्थेची वाटचाल जिल्ह्यातील इतर कामगार संस्थांसाठी प्रेरणादायी ठरली आहे, असे त्यांनी सांगितले. संस्थेच्या प्रगतीत स्व. घनश्यामजी साळवे यांचे योगदान कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी नमूद केले.
संस्थेचे संचालक तसेच जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी मानद सचिव अनंत साळवे यांनीही सभासदांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन साळवे, महावाडा जंगल कामगार सोसायटीचे अध्यक्ष गावडे, जिल्हा संस्थेचे प्रभारी सचिव झाडे, पर्यवेक्षक वालको, माशाखेत्री यांच्यासह संस्थेचे संचालक मंडळ, जंगल कामगार सोसायटीचे संचालक व सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here