तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत विकास विद्यालयाचा दणदणीत विजय

41

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत विकास विद्यालयाचा दणदणीत विजय
– १७ वर्षे वयोगटातील संघाची बाजी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी थाटात प्रवेश
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २१ : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत विकास विद्यालय, कुरखेडा येथील १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी आपल्या दमदार खेळाची छाप उमटवत दणदणीत विजेतेपद पटकावले. या शानदार कामगिरीच्या जोरावर विद्यालयाच्या संघाने आता जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी दिमाखात प्रवेश केला आहे.
स्पर्धेत सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. उत्कृष्ट कौशल्य, सांघिक समन्वय, जिद्द आणि विजयाची भूक या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्धी संघांना मात देत विजेतेपदावर नाव कोरले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीने विकास विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल विजयी संघातील खेळाडू, क्रीडा शिक्षक व मार्गदर्शकांचे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांनी अभिनंदन केले. जिल्हास्तरीय स्पर्धेतही यशाची परंपरा कायम ठेवावी, यासाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here